Blogs

The Best Reading Books platform and Blogs


Written By Mr. Chaitnya Kurhekar
0

Atalji

Media By Chaitnya Kurhekar, at 8:46 pm

कविता आणि संघर्ष हि ज्या व्यक्तिमत्वाची ओळख आहे, त्यांची दीर्घ भाषणे ऐकण्यासाठी सदैव कान आतुरलेले असायचे असे हे आपले अटलजी...

पोखरणला १९८४ साली अणुस्फोट करण्याचे ठरवून सुद्धा अमेरिकेच्या दडपणाखाली निर्णय मागे घेण्यात आला. १९९५ साली सुद्धा तेच झाले. १९९८ साली अटलजींनी जगाच्या दडपणाला भीक न घालता अणुस्फोट घडवून आणले आणि "देश निर्बंधाचा दंश सहन करील" अशी घोषणा केली.

१७ डिसेंबर १९९२ रोजी लोकसभेत अविश्वासदर्शक ठरावावर केलेले अटलजींचे भाषण आजही लक्षात राहते -"ती सभा नाही ज्या सभेत कोणी वृद्ध नाही, तो वृद्धच नाही जो धर्माचे आचरण करीत नाही आणि तो धर्मच नव्हे ज्याच्यात सत्य नाही. आणि जे कपटाकडे घेऊन जाते ते सत्य नाही. आज या सदनात मी जे काही बोलेन ते सत्यच बोलेन आणि सत्याशिवाय अन्य काहीच बोलणार नाही..." - आयुष्यभर सत्याची वाट न सोडणारे असे हे व्यक्तिमत्व…
लोकमान्य टिळकांनी गीतारहस्यात सांगितल्याप्रमाणे- "सर्व लोकांचे सार्वकालिक कल्याण ज्याच्यात आहे तेच सत्य"- वाजपेयींची सत्यवादिता हि या प्रकारात मोडणारी आहे.
याच भाषणात या देशाचा राष्ट्रवाद कोणता, या देशाची मुळे कोठे आहेत यावर बोललेले अटलजी आजही तितकेच समर्पक आहे.
जर गांधीजींची कल्पना आपण तिरंगी झेंड्याशिवाय करू शकत नाही तर भगव्या झेंड्याशिवाय शिवाजीमहाराजांची पण कल्पना करणे अशक्यच- हे म्हणणारे अटलजी
"जातीय दंग्यांकडे पक्षाचा दृष्टिकोन बाजूला ठेवून बघितले पाहिजे. जातीय दंगे हे केवळ पार्टीचे प्रश्न नसून राष्ट्रीय समस्या आहेत." आणि हे हि सांगणारे अटलजीच.

ज्या वेळी १३ दिवसाच्या मंत्रिमंडळात पेचप्रसंग निर्माण झाला होता त्यावेळी १२ व्या दिवशी अटलजी परमपूज्य रज्जूभैयांना भेटायला केशवकुंज येथे आलेले. संघाचे जेष्ठ प्रचारक कै. लक्ष्मणराव भिडे हे असे सांगतात कि वाटेत या दोघांची भेट झाली त्यावेळेस लक्ष्मणरावांनी सहज प्रश्न केला की बहुमताची शक्यता आहे का ? वास्तविक तत्कालीन परिस्थिती पाहता प्रश्न खरंच गंभीर होता पण , " अरे कोण येणार ? एक दिवस राहिला आहे. बघू , नाहीतर उद्या मी राजीनामा सादर करून सर्व सोडून देईन." हे त्यांचे सहज उत्तर...
आणि दुसऱ्या दिवशी संसदेत जे काही घडले, त्यांचे सुसंस्कृत, शालीन भाषण, आणि नंतर राजीनामा देण्यास राष्ट्रपती भावनाकडे जाण्यास निघालेले अटलजी आजही देशाच्या मनावर कोरले गेलेलं आहे. हेच त्यांचे चारित्र्य आहे आणि हीच त्यांची आपल्या ध्येयाशी एकनिष्ठ राहण्याची वृत्ती.

"प्रतिशोधाची भावना चांगली नाही कायदा हातात घेण्याची कोणालाही परवानगी नाही परंतु हा नियम फक्त हिंदूंनाच लागू आहे काय. आता हिंदू मार खाणार नाहीत"- विरोधी पक्षात असताना असे ठणकावून सांगणारे अटलजी, राम जन्मभूमीचा विषय सुद्धा त्यांनी राष्ट्रीय भावनेचा विषय केला. पण प्रारंभापासूनच या भूमिकेविषयी बोलताना त्यांचे मत ठाम होते की हा मुद्दा जया-पराजयाचा नाही किंवा कुठल्या एका समुदायाचा विजय आणि दुसऱ्याचा पराजय असाही नाही. याबद्दल आपण आपला दृष्टीकोन, आपले विचार आणि आपली भूमिका स्पष्ट ठेवायला हवी. अन्यथा भविष्यकाळात अनंत कटकटी त्यामुळे निर्माण होतील.

राम मंदिराच्या मुद्द्यांवर "मेरा परिचय" चा परिचय संसदेत देण्याचे विसरले, हिंदूत्वाचा विषय सोडून सत्ता जवळ केली हा निरर्थक आरोप त्यांच्यावर होत आलेला आहे, पण राममंदिर कपटाने उभारले जाणार नाही. राम मंदिर उभारले जाईल ते एका नैतिक विश्वासाच्या बळावर. याही आपल्या बोलण्यावर ते शेवटपर्यंत ठाम राहिले. समाजातील हिंदुत्ववादी विचारांचा, हिन्दुत्व विचार मानणाऱ्या लोकांचा, राजकीय पटलावर एक प्रभावशाली गट तयार करून त्याला समाज जीवनांत, राजकीय परिघात acceptance मिळवून देण्याचे बहुमूल्य असे योगदान अटलजींचेच.

१३ डिसेम्बर २००२, संसदेवर हल्ला झाला. काही वेळातच भारतीय सैन्य सीमेवर जाऊन उभे राहिले. पण आत शिरले नाही. सिमेवर उभे करण्याचा पण आत न शिरण्याचा दोन्ही निर्णय अटलजींचेच. कारगिल चे युद्ध सुरु असताना व्हाईटहाऊस मधून फोन येतो "लगेच वाशिंग्टनला भेटायला या". Politically जरी हे निमंत्रण वाटत असला तरी एकादृष्टीने तो आदेशच असतो. त्यावेळेस घेतलेल्या निर्णयावर पुढचा सगळं इतिहास घडला. अटलजी क्षणाचाही विलंब ना लावता नम्र भाषेत आपला नकार कळवतात. अचूक निर्णय योग्य वेळी घेण्याची त्यांची क्षमता काळाच्या कसोटीवरही वेळोवेळो सिद्ध झालेली आहे.

सर्वाना बरोबर घेऊन जाण्याची आणि सहमतीची भाषा करणाऱ्यांना सामाजिक दृष्ट्या wide acceptance मिळतो खरा पण राजकीय दृष्ट्या हे लोक अस्पृश्यच ठरवले गेले हाच इतिहास आहे. आणि हे आपले दुर्दैव आहे. आपल्या राजकीय जीवनात दीर्घकाळ विरोधी पक्षात घालवलेला नेता म्हणून त्यांची ओळख होती. सहसा विरोधी बाकावर इतका काळ घालवल्यावर साहजिकच स्वभावात कडवटपणा आणि प्रत्येक गोष्टीला विरोध करण्याची वृत्ती बळावते. पण अटलजी याला अपवाद होते. नकारात्मक विचारसरणी आणि मनाचा कोतेपणा त्यांच्या व्यक्तिमत्वापासून कोसो दूर होते. मतभेदाच्या राजकारणापेक्षा सहमतीच्या राजकारणालाच त्यांनी नेहेमी प्रोत्साहन दिले. संबंधित राज्यात त्यावेळी भाजपचे सरकार नसून सुद्धा कावेरी विवाद त्यांनी ज्या तऱ्हेने सोडवला हे सहमती आणि मुत्सद्देगिरी याचेच द्योतक आहे.

अटलजींच्या जीवनाकडे बघितले तर स्वयंसेवक, कवी आणि राजकीय नेता हे तिन्ही रूपे सारखेच आकर्षक आणि तितकीच महत्वपुर्ण आहेत.
अश्याच तपस्वी, अनुभवसमृद्ध, अमोघ वाणीचे, पवित्र अन तेजस्वी विचारांची खाण असलेले ज्यांनी स्वयंसेवक - प्रचारक - जनसंघाचा कार्यकर्ता - खासदार - जनसंघ - भाजपाचे अध्यक्ष - परराष्ट्रमंत्री - पंतप्रधान - राष्ट्रनेता असा प्रवास साधलेला आहे अश्या 
#अटल_बिहारी_वाजपेयी यांचा जन्मदिवस...

अटल बिहारी वाजपेयी यांना विनम्र अभिवादन

- चैतन्य कुऱ्हेकर

0 Comments

Leave a Reply

About Us

TheBooksTrunk is good news for all the Bibliophiles out there who live for the utmost joy of reading and collecting the gems in form of books. We are an online bookstore which delivers happiness in the form of books at your doorstep across India. We have a collection of more than 30 million books...

Categories
Latest Blogs
No Record Found
What's New?
Image

Jaico Publishing

This is nice block written by Sri Shree, As we seen in this blow we found ext...

View All

 ON
DEMAND
 
  • Less than 6 months

    1 year to less than 3 years

    3 years to less than 5 years

    5 years or more